नंदा खरे - लेख सूची

महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार

एकाच दिवशीच्या वृत्तपत्री मथळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्ब–वर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा! माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान …

‘ल्यूटाइन बेल’

लॉइड्ज् ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्यावसायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती …

दोन टिपणे

१. मी!डिजिटल! होणार! नाही! डिजिटल, नोटबंदी, क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम —————————————————————————— नोटबंदीच्या अव्यवस्थेतून उद्भवलेल्या त्रासाबद्दल अतिशय समर्पक व त्रोटक भाष्य! —————————————————————————— माझी बँक तशी चांगली आहे. वीसेक वर्षे माझे खाते तिथेच फक्त आहे, आणि माणसे ओळख ठेवून सभ्यपणे वागतात. पण हे माणसांचे झाले, ज्यांच्या वर आता एटीएम-डेबिट कार्डे आणि संगणकचलित ‘सिस्टिम्स’ येऊन डोईजड होताहेत. पहिला त्रास …

आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही!

जे एन यु, उच्च शिक्षण, विचारस्वातंत्र्य —————————————————————————– प्रचंड राजकीय मरगळ असण्याच्या ह्या काळात एखादा कन्हैया कुमार कसा तयार होतो, ह्याचा माग घेतल्यास आपण थेट जेएनयुच्या प्रपाती, घुसळणशील वातावरणापर्यंत जाऊन पोहचतो. तिथल्यासारखे विद्रोही, प्रश्न विचारण्यास शिकविणारे वातावरण उच्च शिक्षणाच्या सर्वच केंद्रांत असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा हा लेख. —————————————————————————– “रस्त्याने चालताना किंवा बागेतल्या बाकांवर बसून …

पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (२)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्त्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा नंदा खरेंनी करून दिलेल्या परिचयाचा उत्तरार्ध. एक इतिहासकार …

श्रद्धांजली : अनिल पाटील सुर्डीकर

गावगाडा- शतकानंतर – अनिल पाटील सुर्डीकर दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो; घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा बकरीच्या पोराचा बळी दे, असा देव दुर्बलांचा घात करतो! वामन मात्र बळीचा दडपून …

पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (१)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन —————————————————————————इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपुर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा खास परिचय नंदा खरेंच्या शैलीत … —————————————————————————      ‘फक्त …

नाही मानियले बहुमता

‘‘या प्रकारच्या मासिकाला वर्गणीदार मिळतात तरी किती?’’ हा बहुधा ‘आजचा सुधारक’बद्दल सर्वांत जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असावा. आपल्या आजवरच्या पंचवीस वर्षांत ‘आसु’ने एखाददोन वर्षे नऊशेचा आकडा ओलांडलाही, पण प्रातिनिधिक वर्गणीदारसंख्या मात्र सातशे ते आठशेच मानायला हवी. याशिवाय चाळीसेक अंक वृत्तपत्रे व समविचारी नियतकालिकांना पाठवले जातात, पंचवीसतीस अंक संपादकांमध्ये वाटले जातात आणि सत्तरेक ज्यादा प्रती …

मन केले ग्वाही (भाग ३)

पिठामिठाचे दिवस एकोणीसशे पासष्ट-सहासष्टमध्ये अनेक भारतीय लोक एक सेक्युलर उपास करू लागले. तृणधान्यांची गरज आणि उत्पादन यांत साताठ टक्के तूट दिसत होती. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी सुचवले, की सर्वांनी जर आठवड्यात एक जेवण तृणधान्यरहित केले तर तृणधान्ये आयात करावी लागणार नाहीत. हे म्हणणे बहुतांश भारतीयांना पटले, आणि ‘शास्त्री सोमवारा’चे व्रत सुरू झाले. आजही अनेक …

मन केले ग्वाही (भाग २)

प्रजा अडाणीच ठेवावी! भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे बहुतेक नेते उच्चशिक्षित होते. बरेचसे बॅरिस्टर होते. इतर बरेच मानव्यविद्यांचे विद्यार्थी होते. यामुळे सुरुवातीची मंत्रीमंडळेही बहुतांशी उच्चशिक्षित असत. कायदा-मानव्यविद्यांसोबत त्यांत काही डॉक्टर -इंजिनीयरही असत. हे स्वाभाविक होते कारण चळवळींचे नेते लढाऊ असावे लागतात, तर मंत्री व्यवहारी आणि नियोजनाचा विचार करणारे असावे लागतात. पहिली चाळीस-पन्नास वर्षे मंत्रिमंडळे अशी वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांमधून …

मन केले ग्वाही (भाग एक)

खिळखिळी लोकशाही आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल संख्यात्मक, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे. या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा …

मन केले ग्वाही (भाग १)

खिळखिळी लोकशाही आजचा सुधारक या मासिकाचे प्रकाशन सुरू झाल्याला लवकरच पंचवीस वर्षे होतील. एप्रिल एकोणीसशे नव्वद ते मार्च दोन हजार पंधरा या काळात जगात मोठाले बदल झाले. काही बदल पातळीचे, quantitative होते, तर काही गुणात्मक, qualitative होते. काही मात्र या दोन्ही वर्गांपैक्षा मूलभूत होते, आलोक-बदल किंवा paradigm shift दर्जाचे. या बदलांबद्दलचे माझे आकलन तपासायचा हा …

पुरोहित राजा आणि राजधर्म

आज (२३ एप्रिल २०१४) सर्व पत्रपंडित आणि ‘पोल’पंडित एकमुखाने सांगत आहेत की येत्या १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधानपदाची वस्त्रे मिळतील. मतभेद असलेच तर भाजपचे संख्याबळ, सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून व आघाडीबाहेरून किती मदत लागेल, त्या मदतीसाठी काय मोल द्यावे लागेल, वगैरे तपशिलाबाबत आहेत. इथपर्यंत पोचण्यासाठी मोदी, त्यांचा पक्ष भाजपा, त्यांचे ‘माहेर’ …

सरड्यांमधील लिंग गुणोत्तर – जादा नरसंख्येचा परिणाम

बहुसंख्य भारतीयांना अपत्य म्हणून मुलगे हवे असतात, आणि मुली नको असतात. पूर्वी मुलगी जन्मल्यास तिला मारून टाकायचे प्रयत्न केले जात असत. हेळसांड, अन्न तुटवड्याच्या काळांत उपासमार, हेही नित्याचे होते. आज गर्भजलपरीक्षा, अल्ट्रासाऊंड वगैरे तंत्रे वापरून मुलींना भ्रूणावस्थेतच ‘हेरून’ मारून टाकले जाते. या सर्व वृत्तींवर, त्या अनिष्ट असण्यावर मेगाटनांनी कागद आणि किलोलीटरांनी शाई खर्च झाले आहेत …

ज्याची त्याची श्रद्धा ! ?

दुसऱ्या महायुद्धानंतर काही लहानखुऱ्या जर्मन गावांनी एक प्रयोग केला. नगरपालिकेसाठी कोणी काही काम केले किंवा वस्तू पुरवल्या, तर नगरपालिका पैसे देण्याऐवजी एक प्रमाणपत्र देई. नागरिकांना नगरपालिकेला घरपट्टी, पाणीपट्टी देण्यासाठी हे प्रमाणपत्र पैशांसारखे वापरता येई. पण हा पैशांसारखा उपयोग प्रमाणपत्र मिळाल्यापासून वर्षभरातच करता येई. त्यानंतर ते प्रमाणपत्र केवळ कागद म्हणूनच उरत असे! उदाहरणार्थ, मी नगरपालिकेला दहा …

हेरगिरी आणि शहाणपण

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रेट ब्रिटन (यापुढे ‘ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’) ही जगातली एकमेव महासत्ता होती. एकोणिसावे शतक संपताना तिचे साम्राज्य विरायला लागले; कुठेकुठे तर फाटायला लागले. पहिल्या महायुद्धाने इंग्लंडला स्पर्धक उत्पन्न होत आहेत हे अधिकच ठसवले. ते युद्ध जिंकायला इंग्लंडला यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची (यापुढे ‘अमेरिका’) मदत लागली, आणि अमेरिका महासत्ता आहे हे जाहीर झाले. …

बंधुत्व-अभाव

(एक) दर माणसामागे किती जमीन उपलब्ध आहे असा विचार केला, तर प्रत्येक अमेरिकन हा प्रत्येक भारतीयाच्या सुमारे अकरा पट ‘जमीनदार’ आहे. दोन्ही देशांमधल्या जमिनीकडे पाहायच्या दृष्टिकोनांत अर्थातच बराच फरक आहे. हा फरक सर्वांत तीव्रतेने दिसतो तो प्लॉट-फ्लॅट या संबंधातल्या रीअल इस्टेट उद्योगात. भारतीय माणसांना मालकीचे घर असणे, त्यात दरडोई ऐसपैसपणा असणे, ते फॅशनेबल वस्तीत असणे, …

चिं.मो.पंडित

एंजिनीयरिंग कॉलेजात आम्हाला एक अभ्यासक्रम असायचा तंत्रज्ञानाचा इतिहास’ नावाचा. केमिकल एंजिनीयरिंगच्या क्षेत्रात ऋषितुल्य मानले जाणारे प्रा. एन.आर.कामत आम्हाला 1962-63 साली हा विषय शिकवायचे. एंजिनीयरिंग-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पातळ्या पिंजत वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित कौशल्ये सांगणे प्रा.कामतांना आवडायचे. आज पन्नासेक वर्षांनंतर जसा आठवतो तसा कामतसरांचा क्रम नोंदतो — (1) एखादे काम कसे करायचे ते जाणणारे, ते कारागीर; गवंडी. मशिनिस्ट, …

साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर

निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे …

साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा

नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत …

साहित्यातून विवेकवाद (२) – जॉर्ज ऑर्वेल

स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट …

साहित्यातून विवेकवाद (१) – स्टाईनबेक

[साहित्यातून विवेकवाद नावाने काही लेखांमधून काही साहित्यकारांचे लिखाण तपासणारी ही लेखमाला आहे. काही थोडे अपवाद वगळता मराठी साहित्य व्यक्तिगत व कौटुंबिक भावभावनांमध्येच गुंतलेले असते. अपवादापैकी वा.म.जोशींवर आजचा सुधारकने विशेषांक काढला होता (डिसें. 1990-जाने. 1991, अंक (1 : 9-10). जरी लेखमाला मी सुरू करत आहे, तरी इतरांनाही या मालेतून साहित्य व साहित्यिक तपासण्यास आम्ही आवाहन करत …

समता (भाग 2) पुस्तकपरिचय : द स्पिरिट लेव्हल

[गेल्या अंकात विषमता आणि चिंता, विषमतेचे माप, आसास निर्देशांक हे भाग पूर्ण आले. आलेख आणि सांख्यिकी याची सुरुवात येथे पुन्हा देत आहोत.] TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा …

समता पुस्तक-परिचय : द स्पिरिट लेव्हल

विषमता आणि चिंता माणसे सतत एकमेकांशी तुलना करत असतात. उंची, वजन, रंगरूप अशा सुट्या गुणांपासून सुरू होत तुलना अखेर सामाजिक स्थानापर्यंत जाऊन पोचते. रॅल्फ वॉल्डो इमर्सन या अमेरिकन विचारवंत व साहित्यिकाने नोंदले, “प्रत्येक माणसाच्या नजरेत एकूण माणसांच्या प्रचंड श्रेणीपटातले स्वतःचे स्थान नेमके ठरलेले असते, आणि आपण सतत ही मोजपट्टी वाचायला शिकत असतो, याची खात्री आहे.’ …

आम आदमी कोणाला म्हणावे?

भल्ला 1 जुलै 2011 च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये सुरजीत एस. भल्लांचा एक लेख आहे, सुप्रीम कोर्ट व्हर्सस द स्टेट नावाचा. भल्ला सांगतात, की 2009-10 मध्ये भारतात 7.46 कोटी लोक आयकर भरत होते. या सर्वांनी मिळून रु.3,32,000 कोटी आयकर भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांनी रु. 1,48,000 कोटी आयकर भरला. उरलेले रु.1,84,000 कोटी काळे झाले. म्हणजे ए. राजामुळे …

मराठी तरुण काय वाचतात ?

1.0. छप्पन्न तरुण-तरुणी. वये, 18 ते 25 वर्षे. शिक्षणे, बारावी ते पी.एच.डी. करत असलेले; पण डॉक्टर-एंजिनियरांची संख्या भरपूर. गावे, महाराष्ट्रभर विखुरलेली. निर्माणसाठी (हा एक युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम आहे, अभय व राणी बंग यांनी सुरू केलेला.) एकत्र आलेली ही मुले. एका अर्थी महाराष्ट्रातल्या संवेदनशील, सामाजिक जाणिवा जाग्या असलेल्या मुलीचा हा छेद किंवा सूचिपरीक्षा. 1.1. तर या मुलांना …

पुस्तक-परिचय : लंडननामा शहरे कशी घडतात

अनेक जण असे मानतात, की भारत हा देश खेड्यांमध्येच वसलेला आहे. वास्तव मात्र असे नाही. आज देशातील चाळीसेक टक्के प्रजा नागर आहे. महाराष्ट्रात तर आज नागर प्रजा आणि ग्रामीण प्रजा यांच्या संख्या जवळपास सारख्याच आहेत. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही. यामागे जीवनदृष्टी, विकासातले अग्रक्रम अशा अनेक मूलभूत बाबी आहेत. जसे, गांधीवादी-सर्वोदयवादी “खेड्यात जा”, असा संदेश …

नाशिकच्या बैठकीचा वृत्तान्त

आजचा सुधारक तीन मंडळे आणि एक व्यक्ती मिळून चालवले जाणारे मासिक आहे. मासिकाची मालकी विश्वस्त-मंडळा कडे असते, पण दैनंदिन व्यवहारांत तो अधिकार प्रकाशका चा असतो. इतर सर्वांचे काम मासिकाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत ठेवणे व यात चुका होत असल्यास योग्य त्या सूचना देणे ही विश्वस्त-मंडळाची जबाबदारी असते. प्रकाशक यासोबत मासिकाचे उत्पादन आणि वितरण यावरही देखरेख करत असतो. …

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.] काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू …

कसोटीचा दगड…… पाठराखा

“आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर …

कसोटीचा दगड —– पाठराखा.

आपले मतभेद आहेतच, कधी तपशिलाचे, कधी तात्त्विक. तसे मतभेद तर असणारच, कारण दोघेही आपापल्या अनुभवांच्या, आकलनाच्या आधाराने मते घडवत आहोत. पण हे मतभेद संवादाला बाधा आणत नाहीत. उलट तपशीलवार संवादातून मतैक्य कुठेकुठे आहे, एकमेकांना पूरक भूमिका आहेत का, हे सारे प्रश्न सोडवता येतील. कृतीच्या पातळीवर ज्यात (भाषणे, लेखन हेही आलेच) तर नक्कीच मतैक्य भेटेल. तर …

तापमानवाढीच्या गोष्टी

माणसांना वेगवेगळ्या वस्तू, घटनांच्या ध्वनिचित्रफिती, प्रत्यक्ष घटना वगैरे दाखवून त्या ऐकण्या-पाहण्याने मेंदूंत काय क्रिया घडतात; हे तपासायचे शास्त्र-तंत्र आता विकसित झाले आहे. त्याच्या वापरातून एक मजेदार निष्कर्ष निघाला. माणसांपुढे घडणाऱ्या दृश्यांत माणसे मनाने (मेंदुव्यवहाराने) सहभागी होतात! सिनेमे पाहताना नायक-नायिकांच्या मनांत असतील तसे व्यवहार प्रेक्षकांच्याही मनांत होतात. गोष्टी वाचताना-ऐकतानाही असे घडते. सापाचे चित्र पाहणेही साप पाहण्याला …

मालिकाबद्ध पुस्तकातले डोह

आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे …

तीन टिपणे

शॉर्ट में निपटाओ! डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाचे एक त्रोटक वर्णन पाहा एखादी सजीव रचना टिकून राहते, कारण ती तिच्या परिस्थितीशी अनुरूप असते. ती परिस्थितीशी अनुरूप असण्याचा पुरावा हा, की ती टिकून राहते. वरच्या परिच्छेदातले वर्णन हे वर्तुळाकार युक्तिवादाचे (circular argument) उदाहरण आहे. ते तर्कदुष्ट आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जीवजाती कशा घडल्या यावर ते काहीही प्रकाश टाकत …

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन …

एक क्रान्ती : दोन वाद (भाग ४)

[एक क्रान्तीःदोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे …

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ३)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली-उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. आता त्यापुढे-] क्यूबा १८९५ साली क्यूबा स्पेनपासून स्वतंत्र झाला. लोकशाही व्यवस्थेत वारंवार सेनेचा हस्तक्षेप, हा क्यूबाचा …

एक क्रान्तीः दोन वाद (भाग २)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-] परदेशगमन!औद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे …

एक क्रान्ती : दोन वाद (भाग १)

प्रस्तावना: इसवी अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतांश माणसे शेती व पशुपालन ह्यांवर जगत असत. त्यांच्या जीवनपद्धतीचे वर्णन अन्नोत्पादक असे केले जाते. त्यामागील राजकीय-आर्थिक-सामाजिक व्यवस्थेचे वर्णन सामंती , फ्यूडल (feudal) असे केले जाते. अठराव्या शतकाच्या मध्यावर मात्र एक नवी जीवनपद्धती उद्भवली. आधी इंग्लंडात उद्भवलेली ही पद्धत पुढे युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अशी पसरत आज जगाच्या बहुतेक …

कोणता भारत ‘चक दे’?

जयदीप साहनी हे सध्या चर्चेत असलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाचे पटकथाकार आणि गीतकार. ह्याआधी ‘कंपनी’ आणि ‘खोसला का घोसला’ हे लोकप्रिय आणि समीक्षकांनी वाखाणलेले चित्रपटही साहनींच्या लेखणीतून उतरले आहेत. ‘चक दे’साठी अभ्यास करायला आपण शोधनिबंध लिहीत आहोत असे सांगत साहनींनी हॉकीचा खेळ आणि त्याचे खेळाडू यांचा कानोसा घेतला. निरीक्षण इतके नेमके ठरले की लॉस एंजलिसला …

विषमता की विविधता?

ऑलिव्हर जेम्स हा ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ माणसांच्या मूलभूत भावनिक गरजांवर विचार करत होता. शरीरांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा, तशा मनांसाठी कोणत्या ? जेम्सची यादी चार एकमेकांशी निगडित भावनांची आहे. पहिली गरज आहे स्वतःला सुखवस्तू मानता येण्याची. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत, असे वाटणे गरजेचे असते. इथे प्रत्यक्षात गरजेच्या वस्तू आहेत …

संपादकीय ‘आजचा सुधारक

मनुष्याची एक पूर्णावस्था असते आणि ती घडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती म्हणजेच सुधारणा, ही आगरकरांच्या कामांमागील मुख्य संकल्पना. ही मुक्ती, मोक्ष, अशी पूर्णावस्था नसून पूर्णपणे ऐहिक आणि सामाजिक संदर्भापुरतीच आहे. या पूर्णावस्थेकडे जाणाऱ्या वाटेवर कोणत्या देशातले लोक कुठपर्यंत पोचले आहेत, ते आगरकर तपासतात. आज आपण जगाकडे मुख्यतः इंग्रजी भाषेच्या चष्म्यातून पाहतो. आगरकरांच्याही काळी हीच स्थिती …

शेतकऱ्यांचे देणेकरी

“अख्ख्या आर्थिक दृष्टीतून भारतीय शेतकरी कर्जबाजारी नाही. उलट भारतीय भांडवलदार, व्यापारी आणि सरकार यांना भारतीय शेतकऱ्यांनी गेल्या शतकात एवढे प्रचंड कर्ज दिले, की तेवढे कर्ज कोणताही सावकार कुणाला देऊ शकणार नाही. या शोषकांची कमाल ही, की यांनी शेतकऱ्यांचे कर्ज परत न करता बुडविले आणि उलट शेतकऱ्यांनाच कर्जबाजारी म्हणून घोषित केले. जप्त्या-वॉरंटस्, काळ्या यादीतील शेतकऱ्यांच्या नावाची …

विवेकवादी मनुष्याला रडूही येते!

एकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ …

“सीडी”

आजचा सुधारक चा जाने.-फेब्रु. ०४ (अंक १४.१०) हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरचा विशेषांक होता. अभ्यागत संपादक होता चिंतामणी देशमुख, उर्फ ‘सीडी’. अंक वाचकांपर्यंत पोचताच मौज प्रकाशनगृहाचे श्री. पु. भागवत यांचा दूरध्वनी आला अंकाचे पुस्तक काढावे, आणि यात मौज मदत करेल! पुस्तक निघायच्या बेतात असताना सीडीचे २ डिसें. ०५ ला निधन झाले. भागवतांचा निरोप सीडीला कळवल्यावरची त्याची …

आधुनिक मननशीलता

माणसे विचार कोणत्या अवयवाने करतात? माणसांच्या भावना कुठे उद्भवतात? माणसांच्या विचारांमध्ये कधीकधी ‘तर्कापलिकडे’ असाव्या अशा ज्या अंतःप्रेरणा येतात, त्या कोणत्या जागेतून येतात ? तीन्ही प्रश्नांचे उत्तर मेंदू’ हे आहे. एखादी व्यक्ती विचार करते आहे, तिच्यात काही भावना उपजल्या आहेत किंवा त्या व्यक्तीची अंतःप्रेरणा तिला काही सांगते आहे हे सारे आपण अखेर त्या व्यक्तीच्या वागणुकीच्या निरीक्षणांमधूनच …

संपादकीय

विशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे …

मर्यादा

विज्ञानाशी संबंधित एखादा विशेषांक काढावा असे फार दिवस मनात होते, पण विषय फार मोठा. आज आयुष्याच्या सर्व भागांना तो स्पर्श करतो, व्यक्तिगतही आणि समाजिकही. मग मर्यादा काय घालाव्या? ‘सुरुवात तर करू’ अशा भूमिकेतून ‘विज्ञान : स्वरूप आणि मर्यादा’ हा मथळा निवडला. योग्य अतिथि-संपादकाचाही विचार होत होताच. अशात चिंतामणी देशमुख भेटले. त्यांनी सुचवले, “आधुनिक विज्ञान म्हणा, …

मध्यरात्रीनंतर पाच मिनिटे

माणसे धान्य पेरतात, पण त्यातून उगवणारी पिके मात्र कीटकांना आणि इतर जीवाणूंनाही आवडतात. अशा किडींपासून पिकांचे रक्षण करणे, हा शेतीच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळे नैसर्गिक व कृत्रिमरीत्या घडवलेले पदार्थ वापरून माणसे किडींचा नायनाट करू पाहतात. कधी किडी ह्या पदार्थांना ‘पचवू’ लागतात, तर कधी हे पदार्थ माणसांना व त्यांच्या परिसराला हानिकारक असल्याचे लक्षात येते. माणसांना …

नैतिक प्राणी (भाग ३)

माणसांच्या समूहांमध्ये पूर्ण समता कधीच आढळत नाही. सर्वच समाजां-मध्ये घटक-व्यक्तींना श्रेणींमध्ये विभागलेले असते. ह्या श्रेणींचा उच्चनीच क्रम कधी वयावर अवलंबून असतो, कधी शारीरिक शक्तीवर, कधी संपत्तीवर, तर कधी इतर कोणत्या घटकांवर. समाजाप्रमाणे हे घटक बदलतात, पण त्यांच्यानुसार घडलेली श्रेणींची उतरंड (Hierarchy) मात्र सगळ्याच समाजांमध्ये निरपवादपणे आढळते. हे कसे उपजले? पूर्वी एक आडवळणाचे स्पष्टीकरण दिले जाई. …

नैतिक प्राणी (भाग २)

“We should probe our commonsense reactions to evolutionary theories carefully before concluding that the commonsense itself isn’t a cognitive distortion created by evolution” —- (‘द मॉरल अॅनिमल’ — रिचर्ड राईट). प्र न : व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांपैकी जगण्याला आणि प्रजोत्पादनाला मदत करणारे गुण साऱ्या जीवजातींत पसरतात आणि असे अनेक पिढ्यांमध्ये घडून जीवजातीच्या गुणांचा संच बदलतो. नैसर्गिक …

नैतिक प्राणी (भाग १)

प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्र न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्र न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ …

जीवाचे पीळदार कथासूत्र

येत्या काही महिन्यांत माणसाच्या संपूर्ण जेनोमचा (genom) कच्चा आराखडा आपल्या हातात येईल. या घटनेबद्दलच्या बातम्या तिला वैद्यकीय आणि (बहुधा) नैतिक महत्त्व देतात. माझ्या मते एवढ्याने भागत नाही. मला वाटते की हा माणसाच्या इतिहासातील निरपवादपणे सर्वाधिक बौद्धिक महत्त्वाचा क्षण असेल. कोणी म्हणेल की एखादा माणूस म्हणजे केवळ त्याचे (किंवा तिचे) जीन्स नव्हेत, तर इतरही काही आहे …

बॉम्बिंग बॉम्बे

(‘इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्यूक्लियर वॉर (IPPMW)”, या नोबेल शांतिपुरस्काराने गौरवित संस्थेने प्रकाशित केलेल्या बॉम्बिंग बॉम्बे या एम. व्ही. रमण यांच्या पुस्तकाचा हा सारांश आहे.) आपण कल्पनेने मुंबईवर एक हिरोशिमावर टाकला गेला होता तसा बॉम्ब टाकू. स्थळ असेल हुतात्मा चौकाच्या वर सहाशे मीटर. यात हुतात्मा चौकाचे ‘भावनिक’ महत्त्व आहे. नुसतीच माणसे मारायची झाली …

मांसाहार – उपयुक्ततावादी!

प्राचीन काळच्या भारतीय समाजात मांसाहाराला मान्यता होती, हे डॉ. लोखंडे यांच्या लेखात (१०.९) वयाच पुराव्यांच्या मदतीने दाखवले आहे. पण पूर्वी काय होते आणि ते का बंद झाले, हा एक दृष्टिकोन झाला. मांसाहाराला विरोध करण्यामागची एक सरळसरळ उपयुक्ततावादी भूमिका अशी – सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती खाऊन शाकाहारी जीव जगतात. अशा जीवांना खाऊन मांसाहारी …

एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा

ही आमंत्रणपत्रिका एका मखमलीसारख्या कापडाच्या वीतभर लांब लिफाफ्यात होती. लिफाफा बंद राहण्यासाठी ‘व्हेल्क्रो’चे तुकडे लावले होते, व लिफाफा गोंडे लावलेल्या सोनेरी गोफाने बांधलेला होता. आतमध्ये एका सात इंच लाव नक्षीदार लाकडी दांडीला पाच इंच रुंद व पंधरा इंच लांब सॅटिन-रेशीम जातीचा कापडी पट जोडलेला होता. त्याची गुंडाळी करून तिला एका सोनेरी गोफाने बांधले होते. या …

शरीराला जोडलेला आत्मा

मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे. १) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग …

विक्रम आणि वेताळ : गर्वाच्या खुट्या

राजाच्या खांद्यावरून वेताळ बोलू लागला. त्याचा स्वर नेहमीपेक्षा खिन्न होता. “राजा, आज अकरा में एकोणीसशे नव्याण्णऊ”. आपण गेल्या वर्षी याच दिवशी पोखरण – २ अणुचाचण्या केल्या, हे तुला आठवतच असेल.” राजाने मान डोलावून होकार भरला. “काही लोकांना ह्या चाचण्यांमुळे बुद्ध हसला असे वाटले, आणि एकूणच या घटनेमुळे जगातील इतर देशांमध्ये आपली पत वाढली असे वाटले”. …

अर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही

बाजारपेठ म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ घालून सर्व वस्तूंच्या योग्य किमती ठरून त्याप्रमाणे वस्तू आणि श्रम यांचा विनिमय होणे. या क्रियेला काही जण अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण मानतात. श्री. स.ह. देशपांडे (एप्रिल ९९) हे या बाजारपेठेचे दोन प्रकार सांगतात. खाजगी मालकीच्या आधारे उभी राहणारी (म्हणजे भांडवलशाही किंवा ‘मुक्त) बाजारपेठ; आणि सामुदायिक मालकीच्या आधारावर (संकुचित) उभी असलेली …

राजकारण – पाण्याचे

“राजकारण पाण्याचे” हा डॉ. सुधीर भोंगळे यांचा ग्रंथ हा त्या लेखकाच्या राज्यशास्त्रातील पीएचडी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध आहे. या प्रबंधासाठी लेखकाने अनेक आधार वापरले आहेत. शासकीय व बिगरशासकीय कागदपत्रे, नियतकालिकांमधील लेख व वृत्ते, मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींशी झालेल्या चर्चा, असे अनेकविध आधार लेखक वापरतो. मुळात लेखक शिक्षणाने अर्थशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ आहे, आणि पेशाने शेतीविषयावर दृष्टी …

चर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने

(१)’सत्य’ स्थलकालनिरपेक्ष असते काय? माणसांना विज्ञानाच्या अभ्यासातून जाणवणारे सत्याचे स्वरूप बदलत जाणारे आहे. पण ह्यावरून खुद्द ‘सत्य’ बदलत जाणारे आहे किंवा नाही यावर काहीच प्रकाश पडत नाही. अखेर माणसे त्यांना जाणवणारी सत्ये सांगतात, ती केवळ वेगवेगळ्या रूपकांच्याद्वारे — models किंवा allegories च्या माध्यमातून. अशी रूपके बदलतात, असे विज्ञानाच्या इतिहासातून दिसते. विज्ञानातील रूपके मान्य होण्यासाठी त्या …

स्फुट लेख

एक शहाणा प्रयोग क) शेतमालाच्या किंमती १९७७ ते १९९८ ज्वारी ‘स्वस्तावली १९७० १९९८ १०० किलो ज्वारी = १,००० किलो सीमेंट २०० किलो सीमेंट = २०० किलो लोखंड ४० किलो लोखंड = ४०० लिटर डीझेल ५० लिटर डीझेल = ११ ग्रॅम सोने १.५ ग्रॅम सोने = १,००० किलो ऊस १,००० किलो ऊस = २० किलो द्राक्षे …

विज्ञानाची शिस्त

वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे …

श्रीमती कोठाऱ्यांना उत्तर

श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे. (१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख …

माणसाचा मेंदू मोठा का?

मेंदूच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी प्रमाण तपासले तर माणसाइतका मेंदू इतर फारच थोड्या प्राण्यांमध्ये आढळतो. एकदोन फुटकळ अपवाद सोडता प्रमाणाच्या निकषावर माणसाइतका ‘डोकेबाज’ कोणताच प्राणी नाही. माणसांचे मेंदू दीड-पावणेदोन किलोंचे असतात, आणि शरीरे साठ-सत्तर किलोंची. म्हणजे माणसांच्या शरीरांचा सव्वादोन-अडीच टक्के भाग मेंदूने व्यापलेला असतो. माणसाचे सगळ्यात जवळचे नातलग म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे मानवेतर कपी. हे …

विक्रम, वेताळ आणि अप्रिय उत्तरे

राजा, आता तू मला गोंधळवण्यात पटाईत व्हायला लागला आहेस. पण अजून या ‘असली घी’ खाल्लेल्या ‘पुरान्या हड्डीत’ तुला बांधून ठेवण्याइतकी अक्कल आहे!” वेताळ म्हणाला. राजा मिशीतल्या मिशीत हसत वाट चालत राहिला. ‘राजा, माझ्या घराजवळ एक बंगला आहे. त्याच्या आवारात नोकरांसाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. बंगल्यात एक सुखवस्तू, सुस्वभावी कुटुंब गेली तीसेक वर्षे राहात आहे. ते …

श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर

आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान …

‘सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी’

उडत्या तबकड्यांमधून परग्रहांवरले जीव पृथ्वीवर येतात. इथल्या जीवजातींचे नमुने गोळा करून अभ्यासासाठी न्यायच्या हेतूने ही मोहीम असते. कुत्रे, झाडे वगैरेंना पकडून नेण्यात येते, तसेच माणसांनाही. पण त्या ‘परक्यांना इथल्या व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नसते, म्हणून सर्व ‘नमुन्यांच्या तपासण्या झाल्यावर त्यांना परत स्वगृही पोचवले जाते. मांजरे, गुलाबाची रोपे वगैरेंना या प्रकारांचे स्मरण राहत नाही, व ते जीव …

चिं. मो. पंडितांच्या लेखाच्या निमित्ताने

(१)संगणक माझ्या मेंदूसारखा, बुद्धीसारखा आहे का? काही बाबतीत तरी असावा. त्याला काही प्रकारची स्मरणशक्ती असते. ज्या गोष्टी तो ‘लक्षात ठेवतो त्यांना काही क्रमाने मांडणेही संगणकाला जमते. अशा क्रमांचे ढोबळ अर्थही तो लावू शकतो. उदाहरणार्थ, जर संगणकात वेगवेगळ्या माणसांची वये आणि वजने नोंदली, तर तोवयानुसार नोंदी करून प्रत्येक वयाच्या माणसांची सरासरी वजने काढू शकतो, ती क्रमाने …

के. रा. जोशींच्या लेखातील काही मुद्द्यांविषयी

(१) श्री. मोहनींच्या प्रतिपादनाने श्वेतकेतूचा दंडक उलथवला जातो. असे केल्याने समाज श्वेतकेतूच्या आधीच्या (प्रागैतिहासिक) पद्धतींकडे ढकलला जाईल. सोबतच स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य स्वैर कामाचाराकडे नेईल, व एडजचा धोका वाढेल. (इति के. रा. जो.) मानवांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो की गर्भारपण व त्यानंतर अपत्ये ‘सुटी’ होणे यासाठी माणसांना जेवढा दीर्घ काळ लागतो तेवढा इतर कोणत्याच प्राण्याला लागत नाही. …

विक्रम, वेताळ आणि समान नागरी कायदा

वेताळ : राजा, आजच्या सुधारकाचा ‘समान नागरी कायदा विशेषांक’ वाचलाच असशील ना? विक्रम : (गर्वाने) हो, तर! मी तर ताबडतोब माझ्या कायदेमंत्र्याला सांगून एक ‘आदर्श’ असासमान नागरी कायदा राज्यात लागूही केला. विद्वानांच्या सूचना मी नेहमीच तत्परतेनेअंमलात आणतो. वेताळ: राजा, तू विद्वानांच्या सूचनाच फक्त अंमलात आणतोस, की त्याप्रमाणे केलेले कायदेहीअंमलात आणतोस? विक्रमः (गडबडून) मला समजला नाही, …

मुलांची नैतिक बुद्धिमत्ता

रॉबर्ट कोल्ज (Robert Coles) या हार्वर्डच्या मानसशास्त्रज्ञाचा विषय आहे ‘मुले’. त्याने या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, व त्यापैकी एका पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकही मिळाले आहे. त्याच्या मुलांची ‘नैतिक बुद्धिमत्ता’ (The Moral Intelligence of Children) या नव्या पुस्तकातील काही उतारे २० जाने. च्या ‘टाइम’ मासिकात उद्धृत केले आहेत. त्यातील काही कहाण्या – (क) माझ्या नऊ वर्षांच्या …

श्री पंडित आणि श्री खांदेवाले यांच्याचर्चेच्या निमित्ताने

श्री. चिं. मो. पंडितांचे पत्र व त्याला श्री. खांदेवाल्यांचे उत्तर यावरून सुचलेले कांही मुद्दे असे – (१) वेगवेगळे व्यवसाय व त्यांच्यात ‘रूढ झालेली वेतने यांमधील असमतोल वाढत आहे, व हे पंडित आणि खांदेवाले या दोघांनाही (व मलाही) गैर वाटते. ज्या क्षणी श्रमविभाजन आले, त्या क्षणी व्यवसाय घडले. तोपर्यंत माणसे ‘बहु-उद्देशीय’ असू शकत होती. व्यवसाय, व्यक्ती …

“हट्ट”

आनंद दत्तात्रय मुठे हट्टी होता. वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आईपाशी हट्ट धरला, ‘खर्यारखुर्याह’ क्रिकेट बॅटसाठी. आई म्हणाली, “चारशेची आहे ती! चल, हट्ट न करता शहाण्या मुलासारखी दहा रुपयेवाली फूटपाथवरची बॅट घे.’ आनंद ऐकेना, म्हणाला, “मी श्वास कोंडून धरणार, खरीखुरी बँट मिळेपर्यंत’. दम कोंडून तो लालनिळा झाला, पण बॅट मिळाली. पंधरा वर्षाचा असताना त्यानं व्हिडिओ गेम …

पुन्हा एकदा “सततचा पहारा”

नोव्हें. ९५ च्या आजच्या सुधारकात ज्ञान मिळवण्याच्या मार्गाबद्दल “सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे” या नावाचा एक लेख मी लिहिला. “The price of liberty is eternalvigilance” या वचनाचे भापांतर शीर्षक म्हणून वापरले. विवेकवादी भूमिकेतून साक्षात्कार व अंतःस्फूर्ती हे ज्ञान कमवायचे मार्ग कसे दिसतात, ते पहायचा प्रयत्न होता. असे काही मार्ग आहेत, हे एकदा मान्य केले, …

मानवसमाजातील संस्था आणि पद्धती

जॉर्ज पी. मॅडक (Murdoch) या अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञाने १९४५ साली सर्व मानवी समाजांमध्ये निरपवादपणे सापडणाच्या काही संस्था व पद्धतींची यादी बनवली. ही यादी आमच्या वाचकांपुढे चर्चेसाठी मांडत आहोत.“मराठीकरणावरही” चर्चा व्हावी. (१) वयानुसार गट पाडणे (Age Grading), (२) शारीरिक क्षमतेच्या क्रीडास्पर्धा (AthleticSports, (३) साज-शृंगार (Bodily Adornment), (४) पंचांग (Calender), (५) शुचितेचे शिक्षण (Cleanliness Training), (६) समूहांतर्गत विरचन …

नियमबद्धतानियमाच्या मर्यादा

मला विश्वातील सर्व रचनांची या क्षणीची स्थाने आणि गती सांगा, म्हणजे मी आत्तापासून अनंत काळापर्यंतच्या त्यांच्या (सर्व रचनांच्या) स्थानांचे आणि गतींचे भाकित वर्तवून दाखवीन” – हे लाप्लासचे वाक्य म्हणजे वैज्ञानिक नियमबद्धतावादाचे ब्रीदवाक्य मानले जाते. खरे तर “मानले जात असे” असे म्हणणे जास्त योग्य.लाप्लासने हे विधान केले तेव्हा न्यूटन नुकताच “होऊन गेला होता. गुरुत्वाकर्षणाने आणि गतीच्या …

सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे!

ज्ञान मिळविण्यासाठी बुद्धीला पर्याय शोधण्याच्या शक्यतांबाबतच्या चर्चेत (आजचा सुधारकऑगस्ट ९५, ऑक्टोबर ९५) आजवर अशा दोन पर्यायांचा उल्लेख झालेला आहे. एक आहे साक्षात्कारी (revelatory) ज्ञान, उदा. थिआसॉफिस्टांचे अणु-संरचनेचे ज्ञान. दुसरे आहे अंतःस्फूर्तीचे (intuitive) ज्ञान, उदा. रामानुजन, Kekule वगैरेंचे ज्ञान. या दुसर्या( जातीतले ज्ञान काही बर्या.पैकी स्पष्ट अशा गृहीतकांपासून किंवा पेंद्रिय माहितीपासून काही प्रमेयांपर्यंत किंवा नव्या माहितीपर्यंत …

मनुष्याची उत्क्रान्ती आणि आधुनिक समाज

प्रत्येक व्यक्तीमध्ये जगणे, तगणे, प्रजोत्पादन करणे, वगैरेंसाठी आवश्यक असे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. या गुणांच्या संचाला एकत्रितपणे “परिस्थित्यनुरूपता”म्हणतात. कोणता गुणसंच अनुरूप, हे परिस्थितीमुळे ठरते. प्रत्येक परिस्थितीत जास्त अनुरूपता असलेल्या व्यक्तींची प्रजा भावी पिढ्यामध्ये जास्त प्रमाणात टिकते, आणि याउलट कमी अनुरूप व्यक्तींचे वंश रोडावत जातात. आपल्या शरीररचनांसाठी हे तत्त्व लावणे जवळपास सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ, सूर्याकडून …

वेताळकथाः २ पळा, पळा, कोण पुढे पळे तो!

राजा पुन्हा वेताळाला खांद्यावर घेऊन वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, “राजा, विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम निवडताना स्वत;चा कल, स्वतःची क्षमता, यांच्याकडे लक्ष न देता ‘चलती कशाची आहे, हेच फक्त पाहिले तर त्यातून उद्भवणाच्या प्रश्नांचे एक टोकाचे उदाहरण मी तुला दाखवले. धन्य तुझी, की तू त्या कथेला दलित-ललित न समजता किंवा आयायट्यांवर केलेली टीका न मानता छान …

समतेचे मिथ्य!

गेल्या काही अंकांत सुरू असलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेत नी. र. वर्हाuडपांडे यांचा “समतेचे मिथ्य” हा लेख काही मौलिक भर घालील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उदाहरणार्थ, समता, न्याय या संदर्भात दि. य. देशपांडे म्हणतात तसे वर्हा.डपांडे वेड घेऊन पेडगावला जातात. पूर्वी दसर्यानला एका ताटात तांदूळ घेऊन, त्यात “रावण” रेखूनत्या रावणाला मारीत असत. वर्हासडपांडे असेच …

दुबळी माझी झोळी!

वेताळ विक्रमादित्याच्या खांद्यावरून बोलता झाला : “राजा, तू मोठा विचारवंत आहेस. आपल्या प्रजेचे हित, न्याय, समाजव्यवस्था, मानवांचा स्वतःची उन्नती करायचा मूलभूत हक्क, असल्या विषयांवरची तुझी विवेकी, मानवतावादी आणि उदार मते सर्वांना माहीत आहेत. परंतु मला नियतीने नेमून दिलेले काम आहे, ते तुला गोंधळात टाकण्याचे. याच उद्देशाने मी तुला एक घडलेली घटना सांगतो. या घटनेसारख्या घटना …

देव ताओवादी आहे का?

देव ताओवादी आहे का? रेमंड स्मल्यन (Raymond Smullyan) याच्या ‘द ताओ इज सायलंट’ ह्या पुस्तकातील ‘इज गॉड अ ताओइस्ट?’ हा संवाद हाफस्टाटर आणि डेनेट यांनी संपादित केलेल्या The Mind’s I या पुस्तकात उद्धृत केला आहे. या संवादाचे हे स्वैर व बोली भाषेतील मराठी रूपांतर आहे. मानव : म्हणून म्हणतो, परमेश्वरा, तू जर खरोखरच कृपाळू असशील …

विज्ञानानंतरचा समाज – उत्तर

काही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे. लेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल …

खुळा प्रश्न

सगळ्या विश्वात बातमी पसरली की प्रश्नांची उत्तरं देणारं एक यंत्र निघालं आहे. यंत्र कुणी घडवलं, कसं घडवलं, काही माहीत नाही. यंत्राबद्दलची माहिती विश्वातल्या सर्व सुजाण जीवांना कशी कळली हेही माहीत नाही. फक्त येवढंच कळलं, की कोणताही योग्य आणि नेमका प्रश्न विचारा, आणि प्रश्नोत्तरयंत्र तुम्हाला उत्तर देईल. सोबत पत्ताही होता. तरुण सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटच्या खुर्चीत …

परिसंवाद निसर्ग आणि मानव – ७ पांढरीपांडे-पळशीकर यांना उत्तर

गोरे, पळशीकर, देशपांडे, पुन्हा पळशीकर, पांढरीपांडे, अशी एक विस्तृत आणि महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या विचारमंथनात आपलाही हात दोरी ओढण्यास लावावा, म्हणून हे पत्र. मुळात मी वैज्ञानिक नाही, पण विज्ञानक्षेत्रातील व्यवहार कुतूहलाने पाहणारा आहे. रूढ विज्ञानाच्या चौकटीच्या कडेचे व बाहेरचे संशोधन, त्याचे निष्कर्ष, त्यातून मिळणारे तांत्रिक संकेत, वगैरेंची नेमकी समज मला असेलच, याची मला खात्री …